सलमानच्या लाडक्या बहिणीला शाहरूखनं दिलं महागडं गिफ्ट!

Updated: Nov 19, 2014, 10:31 AM IST
सलमानच्या लाडक्या बहिणीला शाहरूखनं दिलं महागडं गिफ्ट! title=

 

नवी दिल्ली : करण-अर्जुन या चित्रपटात एकत्र दिसलेले शाहरूख आणि सलमान या भावांना एकत्र आणले ते म्हणजे त्यांच्या बहिणीने अर्पिताने. शाहरूख खान हा नेहमीच महागडे गिफ्ट्स देण्याबाबतीत चर्चेत असतो, मग या वेळेस तो कसा मागे राहणार.

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार शाहरूखने अर्पिताला खूप साऱ्या ब्रँडेड हॅण्ड बॅग्स लग्नात भेट दिल्या आहेत. अर्पिताला डिजायनर हॅण्ड बॅग्स खूप आवडतात.

यामुळेच शाहरूखने तिला हॅण्ड बॅग्सचा सेट भेट म्हणून दिला. त्याचबरोबर त्याने सलीम आणि सलमान खान यांना देखील गिफ्ट्स दिले.

अर्पिताच्या लग्नाने का होईना शाहरूख आणि सलमान एकत्र आले, ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल.     

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.