मुंबई : लाखो तरूणींच्या ह्रदयावर राज्य करणार बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला शाहीद कपूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कारण शाहीदचा साखरपुडा झाल्याची बातमी आहे.
दिल्लीमध्ये राहणाऱ्या मिरा राजपूतसोबत शाहीदचा साखरपुडा झाला असून लवकरच ते लग्नही करणार आहेत अशी सुत्रांची माहिती आहे. मिरा अॅक्ट्रेस किंवा मॉडेल नाही. मिरा दिल्लीत राहत असून दिल्ली विद्यापिठात इंग्रजी ऑनर्सच्या तिसऱ्या वर्षात आहे.
शाहीदचे वडील पंकज कपूर एका आध्यात्मिक गुरूचें अनुयायी आहेत. त्यांच्या संत्सगच्या कार्यक्रमानिमित्त शाहीद आणि मिराची भेट झाली होती, अशी सुत्रांची माहिती आहे.
शाहीदने मिराबद्दलच्या नात्यापासून मिडीयाला थोडे दूरचं ठेवले आहे. ‘कॉफी विथ करण' या शोमध्ये बोलतांना 'मी ज्या मुलीशी लग्न करेल ती चित्रपट सृष्टीशी संबधित नसेल' असे शाहीदने आधीच स्पष्ट केले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.