शाहिदच्या बहिणीनं केला गुपचूप साखरपुडा!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्याप्रमाणेच त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर येतंय. 

Updated: Jan 14, 2017, 04:04 PM IST
शाहिदच्या बहिणीनं केला गुपचूप साखरपुडा! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्याप्रमाणेच त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर येतंय. 

शाहिद कपूरच्या अचानक गुपचूपपणे झालेल्या साखरपुड्याच्या बातमीनंतर अनेक तरुणींचा अपेक्षाभंग झाला होता. त्याच्यानंतर आता 'शानदार' फेम त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत गुपचूपपणे साखरपुडा उरकून घेतलाय. 


मयांक वडील मनोज पाहवा यांच्यासोबत

दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पत्नी नंदिता यांच्या तोंडून या साखऱपुड्याची बातमी नकळतपणे बाहेर पडलीय. ओम पुरी यांच्याबद्दल सांगताना 'मी आणि ओम पुरी पंकज कपूर यांची मुलगी सना आणि मनोज पाहवा यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी जाणार होतो. यासाठी ओम यांनी मला फोन केला होता. मी तिथं पोहचणार याआधीच ते माझ्या घरी दाखल झाले होते' असं नंदिता यांनी म्हटलंय. 

यामुळे, सना आणि मनोज पाहवा यांचा मुलगा मयांक यांच्या साखरपुड्याची बातमी फुटलीय. परंतु, या दोघांच्या कुटुंबीयांनी मात्र याबद्दल अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.