करीना - शाहीद पुन्हा दिसणार एकत्र?

एकेकाळाचं लव्हबर्ड अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 

Updated: Dec 18, 2014, 11:54 AM IST
करीना - शाहीद पुन्हा दिसणार एकत्र? title=

मुंबई : एकेकाळाचं लव्हबर्ड अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा एकत्र येण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. 

होय, 'डेढ इश्किया' या सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक चौबे आपला आगामी सिनेमा 'उडता पंजाब'साठी शाहिद कपूर आणि आलिया या दोघांना मुख्य भूमिकेसाठी साईन केलंय. पण, याच सिनेमासाठी करीना कपूर हिलाही साईन करण्यात येतंय, असं समजतंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, करीनाला या सिनेमासाठी जवळपास निश्चित करण्यात आलंय. पण, या सिनेमात तिला शाहिदच्याविरुद्ध कास्ट करण्यात आलंय किंवा नाही? शाहिद-करीना एकाच दृश्यात दिसणार किंवा नाही? यावरचा सस्पेन्स कायम आहे. 

दीर्घकाळानंतर हे दोघे जण एकत्र दिसणार असल्यानं दर्शकांच्याही मनात उत्सुकता कायम आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.