फतवा कुणावर जबरदस्तीनं थोपवता येत नाही - शबाना आझमी

मुंबईच्या एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं संगीतकार ए आर रेहमान यांच्याविरुद्ध फतवा काढलाय. यावर अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार टीका केलीय. 

Updated: Sep 21, 2015, 01:23 PM IST
फतवा कुणावर जबरदस्तीनं थोपवता येत नाही - शबाना आझमी title=

मुंबई : मुंबईच्या एका सुन्नी मुस्लीम संघटनेनं संगीतकार ए आर रेहमान यांच्याविरुद्ध फतवा काढलाय. यावर अभिनेत्री शबाना आझमी यांनी जोरदार टीका केलीय. 

ऑस्कर विजेता संगीतकार रेहमान याची पाठराखण करताना शबाना यांनी मुस्लीम संघटनेलाही फैलावर घेतलंय. एखाद्या व्यक्तीद्वारे किंवा एखाद्या समूहानं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केवळ 'मुफ्ती' फतवा जारी करू शकतो... मुफ्ती स्वत:हून फतवा जारी करू शकत नाही किंवा फतवा हा जबरदस्तीनं कुणावर थोपवताही येत नाही, असं शबाना आझमी यांनी म्हटलंय. 

ईरानी दिग्दर्शक माजिद मजीदी याच्या सिनेमावर 'मोहम्मद : मॅसेंजर ऑफ गॉड' वर मुंबीच्या रजा अकादमीनं आक्षेप घेतयाल. या सिनेमासाठी संगीत रेहमाननं दिलंय. 

यावर, धार्मिक भावनांना धक्का लावण्याचा आरोप ठेवत 'पैगंबरचं ना कोणतं चित्र बनवलं जाऊ शकतं ना कोणत्या ते कोणत्या माध्यमातून समोर मांडलं जाऊ शकतं...' असं म्हणत या संघटनेनं मजीदी आणि रेहमान यांच्याविरुद्ध फतवा जारी केलाय. यामध्ये त्यांना पुन्हा एकदा कलमा पढायला आणि निकाह रचण्याचा आदेश देण्यात आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.