रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमानने कतरिनाला दिला मोलाचा सल्ला

मुंबई : कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअप नंतर कतरिना फारच अपसेट असल्याचं समजतंय.

Updated: Jan 28, 2016, 02:29 PM IST
रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमानने कतरिनाला दिला मोलाचा सल्ला  title=

मुंबई : कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअप नंतर कतरिना फारच अपसेट असल्याचं समजतंय. आपल्या आगामी 'फितूर' चित्रपटाचं शुटिंग करण्यात ती व्यस्त असली तरी ती मनातून मात्र फार दुःखी आहे. 

सूत्रांच्या मते, ही लाँग रिलेशनशीप मोडली ती रणबीरमुळे. रणबीर आणि दीपिका यांचंही अफेअर मोडलं ते रणबीरमुळेच. रणबीरच्या स्वभावाशी जुळवून घेताना कतरिनाला अनेक अडचणी येत होत्या. शेवटी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी त्यांच्यातल्या संबंधांना पूर्णविराम दिलाच. 

गेल्या आठवड्यात 'बिग बॉस ९' च्या ग्रँड फिनालेसाठी कतरिना सलमानसोबत दिसली. तेव्हा दोघांमध्ये बराच काळ या विषयावर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. चेहऱ्यावर हास्य दाखवत असताना आतून मात्र ती खूप दुःखी आहे. 

म्हणूनच सलमानने तिला एक मोलाचा सल्ला दिलाय. 'जे काही मनात आहे ते आत्ताच बोलून टाक. खूप शांत राहिलीस. जे काही आहे ते एकदाचं बाहेर काढून टाक आणि सर्व प्रकरणाला पूर्णविराम दे', असं सलमान तिला म्हणाला. 

सलमानचा हा सल्ला कतरिना आता प्रत्यक्षात उतरवणार का, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.