VIDEO : अभिनेत्रीनं लाईव्ह शोमध्ये फ्राय बेडूक खाल्ला!

पडद्यावर तुम्हाला मोहवून टाकणारी एखादी सुंदर अभिनेत्री तुम्हाला फ्राय केलेलं बेडूक खाताना दिसली तर...

Updated: Aug 18, 2015, 03:55 PM IST
VIDEO : अभिनेत्रीनं लाईव्ह शोमध्ये फ्राय बेडूक खाल्ला! title=

नवी दिल्ली : पडद्यावर तुम्हाला मोहवून टाकणारी एखादी सुंदर अभिनेत्री तुम्हाला फ्राय केलेलं बेडूक खाताना दिसली तर...

हॉलिवूडची अभिनेत्री सलमा हायक हिनं केवळ फ्राय केलेलं बेडूकच नाही तर आणखीही खूप काही किडे खाऊन दाखवलेत... तेही एका लाईव्ह शोमध्ये... 

अमेरिकन टॉक शो 'वॉच व्हॉट हॅपन्स लाईव्ह' या कार्यक्रमा दरम्यान सलमासमोर बेडूक ठेवला गेला... तेव्हा, 'हे तर मी नेहमीच खाते... मी फ्रान्समध्ये राहते आणि बेडूक हा खूपच कॉमन फ्रेंच फूड आहे' असं म्हणत तीनं हा फ्राय केलेला बेडूक मिटक्या मारत खाल्ला... त्यानंतर तिच्यासमोर आणखीही काही सरप्राईजिंग गोष्टी ठेवल्या गेल्या... त्याही तिनं तितक्याच आवडीनं गट्टम केल्या.

सलमानचा विवाह फ्रान्सचा अरबपती फ्रान्स्वा - हेनरी पिनॉल्ट याच्याशी झालाय. त्यांना एक सहा वर्षांची मुलगीही आहे. 

सलमा याआधीही एका सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अनेक किड्यांना खाताना दिसलीय. तिच्या म्हणण्यानुसार, माझ्या डाएटच्या गरजेनुसार मी हे किडे-प्राणी खाते...

व्हिडिओ पाहा :- 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.