सैराटची बॉक्स ऑफिसवरही धूम

गेल्या अनेक दिवसांपासून गाणी आणि ट्रेलरने प्रेक्षकांना वेड लावणारा बहुचर्चित सैराट हा चित्रपट अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळाला. 

Updated: May 1, 2016, 10:27 PM IST
सैराटची बॉक्स ऑफिसवरही धूम title=

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून गाणी आणि ट्रेलरने प्रेक्षकांना वेड लावणारा बहुचर्चित सैराट हा चित्रपट अखेर शुक्रवारी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला महाराष्ट्रातून तुफान प्रतिसाद मिळाला. 

प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद पाहता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत नटसम्राटला मागे टाकण्याची शक्यता आहे. नटसम्राटने तीन दिवसांत तब्बल १० कोटींचा गल्ला जमवला होता. 

एका galaxy reporterच्या वेबसाईटनुसार सैराट सिनेमाने पहिल्या दिवशी तब्बल ४ कोटीपर्यंतचा तर दुसऱ्या दिवशी शनिवारी या चित्रपटाने ३.७० कोटींपर्यंतचा गल्ला जमवल्याची शक्यता आहे. तीन दिवसांत हा चित्रपट १० कोटींहून अधिक गल्ला जमवेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. महाराष्ट्रभर जवळ जवळ 400 चित्रपटगृहांमध्ये 8500 शोजसह हा सिनेमा झळकला असून वीकेडंला सैराटचे जवळपास 100 टक्के शो हाऊसफुल आहेत

सैराट चित्रपटातील आर्ची आणि परश्याची जोडीला प्रेक्षकांनी पहिल्यापासूनच पसंतीची पावती दिली होती. आर्ची आणि परश्याची जरी ही प्रेमकहाणी असली तरी या कथेला नागराज मंजुळेंचा टच आहे.