'सैराट' रिंकू राजगुरू झाली पास

सैराट चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये तूफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातली अभिनेत्री रिंकू राजगुरूची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे.

Updated: May 1, 2016, 10:20 PM IST
'सैराट' रिंकू राजगुरू झाली पास title=

अकलुज: सैराट चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये तूफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातली अभिनेत्री रिंकू राजगुरूची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मन जिंकलेली आर्ची रिंकू नववीची परीक्षा पास झाली आहे. 

रिंकूनं फेसबूकवर नववीची परीक्षा 81.60 टक्के मार्क्स मिळवून पास झाली असल्याचं पोस्ट केलं आहे. रिंकू अकलूजच्या जिजामाता कन्या प्रशालामध्ये शिक्षण घेत आहे. रिंकूनं 81.60 टक्के मार्क मिळाल्याचं सांगितलं असलं तरी व्हॉट्स ऍपवर रिंकू 58 टक्के मार्क्स मिळवून पास झाल्याचा पोस्टही फिरत आहेत.