मुंबई : सैराट चित्रपटातील आर्चीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुला पहिल्याच चित्रपटातून मोठे यश मिळतेय. अवघ्या एका सिनेमाने रिंकू एका रात्रीत स्टार बनलीये.
सैराट चित्रपटातील तिच्या अभिनयाला ६३वा राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. या रिंकू राजगुरुचा उद्या म्हणजेच तीन जून रोजी बर्थडे आहे.
रिंकू दहावीच्या वर्गात गेली असून ती जिजामाता प्रशाला शाळेत शिकतेय. २०१३मध्ये रिंकू नागराज मंजुळेंना पहिल्यांदा भेटली होती. त्यानंतर बरोबर वर्षभरानंतर सैराट सिनेमासाठी तिची निवड झाल्याचे तिला सांगण्यात आले. रिंकूच्या सैराट चित्रपटातील अभिनयाचे कौतुक सर्वच स्तरातून केले जातेय.