मुंबई : या सिनेमाच्या माध्यमातून कथा मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीनं यात केलाय. प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमाच्या माध्यमातून मृणाल कुलकर्णी यांनी या आधीही लवस्टोरीवर आधारित सिनेमा करण्याचा प्रयत्न केला होता. या पेशवेकाळातली एक अजरामर प्रेम कथा म्हणजे रमा माधव हा सिनेमा.
पेशवेकालिन प्रेम कहाणी या सिनेमात तुम्हाला पहायला मिळेल. प्रेम म्हणजे प्रेम असतं या सिनेमानंतर दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णीचा हा दुसरा सिनेमा आहे.
कथा :
रमा माधव. माधवराव पेशवे आणि रमाबाई यांच्या प्रेम कहाणीवर आधारित हा सिनेमा आहे. पेशवेकाळात आपल्या पराक्रमानं अटकेपार झेंडा रोवण्याचं काम ज्यांनी केलं त्या माधवराव पेशवेंच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून करण्यात आलाय.
नानासाहेब पेशवे त्यांच्या पत्नी गोपिकाबाई या दोघांनी उभारलेलं साम्राज्य, ती शौहरत, तो राजेशाही थाट सगळंकाही एका क्षणात नाहीसं होतं. सगळंकाही संपतं.. त्या परिस्थितीत ते हरवलेलं वैभव पुन्हा मिळवण्यासाठी अगदी लहान वयात, माधवराव पेशवेंना सगळा भार आपल्या कोवळ्या खांद्यांवर घ्यावा लागला.. त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या पत्नी रमाबाई पेशवे यांनी. अशा काहीशा ट्रकवरचा हा सिनेमा आहे.
दिग्दर्शन :
पेशवेकालिन प्रेम सिनेमातला फ्लेवर ही तसाच आहे मात्र त्याचा जॉनर वेगळा आहे.. पेशवेकालिन प्रेम कहाणी रुपेरी पडद्यावर साकारणं, ते उभारणं, तो राजेशी थाट तो फिल त्याची उपस्थिती दिसणे, या सगळ्या गोष्टी या सिनेमात आण्ण्यात मृणाल कुलकर्णी यांना यश आलंय.. कशाही प्रकारची तडजोड न करता ती श्रीमंती बिग स्क्रिनवर पहायला मिळते.. खरंतर हे श्रेय नितीन चेद्रकांत देसाई यांनाही तेवढच जातं.. पेशवेकालिन प्रेम कहाणी साकारणं हे सोपे नाही हे जाणुन सुद्धा अशा प्रकारचं आव्हान स्विकारणं यासाठी मृणाल कुलकर्णी यांच्या या धाडसी निर्णयाला हॅट्स ऑफ..
सिनेमाची थिम रमा माधव यांच्या प्रेम कहाणीवर आधारित असल्यामुळे कुठेतरी सिनेमाच्या फर्स्ट हाफमध्ये तो भरकटलेला वाटतो, मात्र दुसऱ्या सत्रामध्ये सिनेमा बहुतांश त्या दोघांची प्रेम कहाणी रेखाटण्यात आली आहे. मृणाल कुलकर्णीचा हा एक खूप चांगला प्रयत्न होता. पण काही ठिकाणी सिनेमा ताणला जातोय असं जाणवतं, विशेष करुन सेकंडमध्ये.
अभिनय :
आलोक राजवाडेनं साकारलेला माधवराव पेशवे त्याच्याकडुन नक्कीच चांगला प्रयत्न होता. आलोकचा अभिनय, त्याची शैली त्या भुमिकेला शोभून दिसते.
छोट्यारमाच्या भुमिकेतली श्रुती कार्लेकर, तिचा अभिनय खुपच छान झालाय. बिग स्क्रिगवरचा तिचा वावर खूप भावतो, खूप गोड वाटतो. केवळ चांगलाच नाही तर तिच्या भूमिकेला साजेसा अभिनय ही तिनं यात केलाय.
सिनेमातली मोठी रमा म्हणजेच अभिनेत्री पर्ण पेठे या भुमिकेसाठी परफेक्ट निवड वाटते. श्रुती मराठे आणि सोनाली कुलकर्णी या दोघींच्या वाट्याला आलेल्या भुमिका त्यांनी चोखपणे पार पाडल्या आहेत.
या सिनेमातल्या ज्या व्यक्तीरेखेचा उल्लेख करावासा वाटतो ते पात्र म्हणजे राघोबादादा. प्रसाद ओकच्या आजवरच्या कारकीर्दीतली त्याचीही भूमिका आणि या भूमिकेतला प्रसाद ओक नक्कीच लक्षात राहणार. प्रसादच्या दमदार अभिनयानं त्यानं ही व्यक्तिरेखा खूप छान प्रकारे रंगवली आहे.
संगीत :
दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेल्या या सिनेमातली गाणी सिनेमाच्या थिमसोबत जाणारी आहे. आदिती राव हैदारीवर चित्रित करण्यात आलेलं गाणं छान आहे पण तिचा अभिनय हवा तितका दमदार वाटत नाही.. एक अभिनय म्हणून जो ग्रेस, जी अदा हवी होती ती यात चुकल्यासारखी वाटली.. खरंतर कदाचित अमृता खानवीलकर किंवा स्वत: सोनाली कुलकर्णीनं या गाण्याला जास्त न्याय दिला असता असं जाणवतं.
रेटींग :
ऐतिहासिक कथानक, भव्य सेटअप, मृणाल कुलकर्णीचं दिग्दर्शन या सगळ्या गोष्टी पाहता या सिनेमाला देतेय 3 स्टार.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.