मुंबई : अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेत्री रणबीर कपूर यांचा 'तमाशा' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि प्रमोशनदरम्यान एकेकाळच्या या जोडप्याच्या जवळीककडे साहजिकच सगळ्यांच्या नजरा वळल्या.
दीपिकाच्या मनात रणबीर - रणवीर असा असलेला गोंधळही बऱ्याचदा दिसून आला. मात्र, रणवीर सिंगला आपल्या प्रेमाबद्दल पूर्ण खात्री आहे... आणि म्हणूनच आपल्या रिअल लाईफमध्ये 'लव्ह ट्रँगल'ला जागा नाही, असं म्हणत आपल्या आणि दीपिकाच्या नात्यात आणखी कुणीही येऊ शकत नाही, असं त्यानं म्हटलंय.
एका मुलाखतीदरम्यान बोलताना रणवीरनं आपल्या लव्ह लाईफमध्ये कोणताही 'ट्रँगल' नाही, असं त्यानं स्पष्टपणे म्हटलंय... आणि बोलता बोलतानाच त्यानं स्वत: दीपिकाचा 'अमेझिंग बॉयफ्रेंड' असल्याचंही म्हटलंय.
दीपिका आणि रणबीर कपूरच्या जवळीकीमुळे रणवीर सिंग आणि कतरीना कैफ यांना असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं.