मुंबई : दीपिका पदुकोण सध्या तिच्या 'पिकू' सिनेमाच्या यशाबाबत चर्चेत आहेत. सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल दीपिकाने तिच्या घरी पार्टी ठेवली आहे. या पार्टीला दीपिकाने तिच्या एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही बोलवलं आहे. त्याचबरोबर सध्याचा तिचा बॉयफ्रेंड रणवीर सिंहलाही तिने या पार्टीला बोलवलं आहे.
दीपिकाच्या या सक्सेस पार्टीत प्रियांका चोप्रा, इरफान खान यांच्यासह अनेक दिग्गज हजेरी लावणार असल्याची बातमी आहे. त्यामुळे दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड आणि सध्याचा बॉयफ्रेंड एकत्र आल्यावर काय होतं हे पाहावं लागणार आहे. सध्या दीपिका आणि रणबीर 'तमाशा' या सिनेमात काम करत आहेत, त्यामुळे रणबीरचं पार्टीत येणं ऐवढं आश्चर्यकारक असणार नाही.
रणबीर-कॅटरिनाच्या लग्नाच्या चर्चेनंतर दीपिकानेही तिच्या लग्नाचा खुलासा केला आहे की, ती एवढ्य़ात लग्न करण्यास उत्सुक नाही. तर दुसरीकडे रणवीर सिंहला लवकरात लवकर लग्न करायचे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.