नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणबीर कपूर जेव्हा कधी पडद्यावर एकत्र दिसतात त्या-त्या वेळी त्यांच्या संबंधावर चर्चा सुरु होते. यावरच बोलताना, मीडियामध्ये ज्या पद्धतीनं माझ्या आणि रणबीरचं नातं रंगवून दाखवलं जातं त्याहून ते खूप वेगळं आहे, असं दीपिकानं म्हटलंय.
आमचं नातं कोणत्या स्तरावर आहे, याला काहीच महत्त्व नाही. आम्ही जेव्हा कधी एकत्र काम करू तेव्हा तेव्हा आमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित होतच राहतील. पण महत्त्वाचं म्हणजे आमच्या दोघांत एक विशेष समीकरण मात्र नेहमीच राहिलंय, असं दीपिकानं एका मुलाखतीत बोलताना म्हटलंय.
एक वर्ष एकमेकांसोबत डेटिंग केल्यानंतर दीपिका आणि रणबीरचे मार्ग वेगळे झाले होते. या दोघांनी याआधी अयान मुखर्जीच्या 'ये जवानी है दिवानी' या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर आता हे दोघे इम्तियाज अलीच्या 'तमाशा' या सिनेमात पुन्हा एकत्र दिसणार आहेत.
दीपिकाच्या म्हणण्यानुसार, आम्ही जीवनात कितीही पुढे गेलो... लोक काहीही म्हणाले... तरीही आम्ही एकत्र काम करणार आहोत. लोक प्रश्न उपस्थित करतील, मात्र आमच्यामध्ये एक विषेश समीकरण आहे, जे शब्दात सांगता येणं शक्य नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.