‘लव्ह बर्ड्स’ रणबीर-कतरिना नव्या घरात राहायला जाणार!

Updated: Nov 12, 2014, 05:15 PM IST
‘लव्ह बर्ड्स’ रणबीर-कतरिना नव्या घरात राहायला जाणार! title=

 

नवी दिल्ली: अभिनेता रणबीर कपूर लवकरच त्याची गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबत नविन घरात राहण्यासाठी जाणार आहे. 

2010 मध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या मैत्रीच्या चर्चा समोर आल्या होत्या.

त्यानंतर 2013मध्ये रणबीर आणि कतरिनाचे स्पेनमध्ये एकत्र फिरतानाचे फोटो इंटरनेटवर लीक झाले आणि त्यांचं प्रेम जगासमोर आलं. 

खरं तर, रणबीर आणि कतरिनानं आपल्या नात्याबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही. पण आता हे दोघं प्रेमी आपआपलं घर सोडून एकत्र नव्या घरात राहायला जाणार आहेत.

त्यावरून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुलीच दिल्यासारखी असेल. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.