'रामलीले'त नवाझुद्दीनच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध

बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याला 'रामलीला'मध्ये मारिचची भूमिका करण्यापासून शिवसेनेनं रोखलंय. 

Updated: Oct 8, 2016, 11:52 PM IST
'रामलीले'त नवाझुद्दीनच्या भूमिकेला शिवसेनेचा विरोध title=

लखनऊ : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी याला 'रामलीला'मध्ये मारिचची भूमिका करण्यापासून शिवसेनेनं रोखलंय. 

सध्या, नवाझ आपल्या गावी बुढानामध्ये सुट्टीसाठी गेलाय. इथंच एका स्थानिक रामलीला मंडळात तो 'मारिच राक्षसा'च्या भूमिकेची तयार करत होता. परंतु, हिंदू संघटनांनी मात्र याला विरोध केला. त्यामुळे, नवाझुद्दीनला आपला कार्यक्रम रद्द करावा लागला. 

रामलीलेत काम करण्याची आपली लहानपणीची इच्छा अपूर्ण राहिल्याची प्रतिक्रिया यानंतर नवाझुद्दीननं नोंदवलीय. परंतु, आपल्याला शांतता हवी असल्यानं हे प्रकरण वाढवणार नसल्याचं नवाझुद्दीननं म्हटलंय.