राम-लखनचा सिक्वल येतोय

१९८९मध्ये सुपरहिट ठरलेला 'राम लखन'चा सिक्वल लवकरच येतोय. आता पहिला प्रश्न आला तो अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफच्या ऐवजी राम लखन कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

Updated: Apr 29, 2016, 08:32 AM IST
राम-लखनचा सिक्वल येतोय title=

मुंबई : १९८९मध्ये सुपरहिट ठरलेला 'राम लखन'चा सिक्वल लवकरच येतोय. आता पहिला प्रश्न आला तो अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफच्या ऐवजी राम लखन कोण असणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

अनेक अभिनेत्यांची नावं या रोलसाठी चर्चेत होती. मात्र आता लखनच्या भूमिकेत रणवीर सिंग तर रामच्या भूमिकेत शाहिद कपूर असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगते आहे. 

मात्र माधुरी दिक्षीत आणि डिंपल कपाडियाच्या रोलमध्ये कोण असणार हे मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. पुढील वर्षी दिवाळीत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.