राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही - अभिनेता रजनिकांत

आपण एक कलाकार असून अभिनय करत राहणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही असं सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल आठ वर्षांनंतर द बॉस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटले. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

Updated: May 15, 2017, 01:33 PM IST
राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही - अभिनेता रजनिकांत title=

मुंबई : आपण एक कलाकार असून अभिनय करत राहणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही असं सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल आठ वर्षांनंतर द बॉस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटले. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

देवानं आपल्याला अभिनय करण्यासाठी पाठवलं असून रसिकांचं मनोरंजन करत राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. राजकीय पक्षांकडून आपल्या नावाचा वापर केवळ मतं मिळवण्यासाठी केला जात असल्याचंही ते म्हणालेत. त्यामुळे या स्पष्टीकरणानंतर आता द बॉस रजनीकांतच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.