शूटींग दरम्यान अभिनेता आर. माधवन जखमी

आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अभिनेता आर. माधवन जखमी झालाय. सोशल वेबसाईटद्वारे त्यानंच ही बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय. 

Updated: Nov 12, 2014, 07:26 PM IST
शूटींग दरम्यान अभिनेता आर. माधवन जखमी title=

मुंबई : आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अभिनेता आर. माधवन जखमी झालाय. सोशल वेबसाईटद्वारे त्यानंच ही बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचवलीय. 

लवकरच येणाऱ्या ‘साला खडूस’ या चित्रपटातून आर. माधवन दीर्घकाळानंतर आपल्या चाहत्यांसमोर दाखल होतोय. पण, त्याला झालेल्या या दुखापतीमुळे शूटींग मध्येच थांबवण्यात आलंय. यामुळे माधवन दु:खी आहे.

याबद्दल बोलताना माधवननं ट्विटरवर म्हटलंय... ‘आज सेटवर जखमी झालोय... नशीब चांगलं म्हणून वाचलोय. पण, खूप राग येतो... जेव्हा माझ्यामुळे शूटींग थांबवावी लागते’.

‘साला खडूस’ या चित्रपटाच्या शूटींगचे शेवटचे चार दिवस बाकी आहेत. हा सिनेमा तामिळ आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तामिळमध्ये या सिनेमाचं नाव असेल 'इरुद्धि सुत्तरू'...

या सिनेमात ४४ वर्षीय माधवन एका सेवानिवृत्त कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन सुधा कोंगरा करत आहेत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.