मुंबई : अभिनेती प्रियंका चोप्राच्या आजीचे आज सकाळीच निधन झाले.
पिगी चॉप्सने नुकताच तिच्या आजीसोबतचा एक फोटा सोशल मीडियावर शेअर केलेला. १ जूनला तिच्या आजीचा ९४वा वाढदिवस चोप्रा फॅमिलीने सेलिब्रेट केलेला.
आजीच्या ९४व्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियंका नुकतेच तिचे शूटिंग संपवून आलेली. तेव्हा आजीच्या घरी तिला तिच्या बालपणीचा हा फोटो मिळालेला.
प्रियंकाने तिच्या लहानपणीचा तिचे वडिल आणि आजीसोबतचा हा फोटो इंन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला. तेव्हा प्रियंका ही तिच्या आजीची प्रिंसेस आहे असेदेखील तिने सांगितलेले.