प्रियंकाचा व्हेंटिलेटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री प्रियंका चोप्रा निर्माती म्हणून मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करते आहे. व्हेंटिलेटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Aug 31, 2016, 07:50 AM IST
प्रियंकाचा व्हेंटिलेटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा निर्माती म्हणून मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करते आहे. व्हेंटिलेटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

राजेंद्र मापुसकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. कलाकारांची भलीमोठी फौज यात पहायला मिळणारे. सिनेमाची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. आपल्या भोवती अनेक मराठी कलाकार, तंत्रज्ञ काम करतात. 

अनेक मराठी लोक कामाच्या निमित्ताने भेटत असतात. ही भाषा आपल्याला स्पष्ट बोलता येत नसली तरी ती आपल्याला खूप आवडते, असं म्हणत या फिल्मकडे आपलं विशेष लक्ष असल्याचं प्रियंका म्हणतेय.