प्रियंकाला कशाची भीती वाटते?

'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार घेतल्यानंतर क्वांटिको या आंतरराष्ट्रीय टीव्ही शोमध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी तिला पीपल्स चॉइस अॅवॉर्डही मिळालाय.

Updated: Feb 10, 2016, 11:36 AM IST
प्रियंकाला कशाची भीती वाटते? title=

मुंबई : प्रियंका सध्या जगातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते. 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार घेतल्यानंतर क्वांटिको या आंतरराष्ट्रीय टीव्ही शोमध्ये जबरदस्त परफॉर्मन्ससाठी तिला पीपल्स चॉइस अॅवॉर्डही मिळालाय.

प्रियंकाला आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही पुरस्कार प्रदान कऱण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान प्रियंकाने तिची खास गोष्ट शेअर केलीय. तिला कशाची भीती वाटतेय. सोनम कपूरचा आगामी चित्रपट 'नीरजा' च्या प्रमोशनमध्ये सहभागी झालेल्या प्रियंकाने यावेळी तिला कशाची भिती वाटते हे सांगितले. 

याबाबतचा व्हिडीओ तिने प्रसिद्ध केलाय. यात आपल्याला नोमोफोबिया म्हणजेच नो मोबाइल फोबिया असल्याचे म्हटले. तिला सतत आपल्या मोबाईलची बॅटरी संपेल, सिग्नल जाईल याची भीती वाटत असते.

 

Hey Sonam Kapoor this is what I've 'learned' to fear! It ain't for the faint hearted!!!! #fearvsneerja

Posted by Priyanka Chopra on Monday, February 8, 2016

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x