ट्विटरवर प्रियंका चोप्राने १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा केला पार

मायक्रो ब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेली वेबसाईट ट्विटरवर अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी झाली असून आपण खूप भाग्यवान असल्याचं तिनं म्हटलय. प्रियंकाने आपल्या चाहत्यांचे आभारही ट्विटरवरूनच मानलेत.

Updated: Jun 22, 2015, 05:27 PM IST
ट्विटरवर प्रियंका चोप्राने १ कोटी फॉलोअर्सचा टप्पा केला पार title=

मुंबई : मायक्रो ब्लॉगिंगसाठी प्रसिद्ध असलेली वेबसाईट ट्विटरवर अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटी झाली असून आपण खूप भाग्यवान असल्याचं तिनं म्हटलय. प्रियंकाने आपल्या चाहत्यांचे आभारही ट्विटरवरूनच मानलेत.

"स्वत:ला लोकांची आवडती समजायला माझ्याकडे १ कोटी कारणं आहेत. स्वत:ला भाग्यवान समजायला माझ्याकडे १ कोटी कारणं आहेत." असं तिनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलय.

प्रियंका नुकतीच 'दिल धडकने दो'मधून दिसली होती. कमीने, फॅशन, ऐतराज, बर्फी, ७ खून माफ, मेरीकोमसारख्या फिल्ममध्ये तीने अभिनय केलाय. लवकरच 'क्वान्टिको' या अमेरिकन मालिकेत ती मुख्य भुमिका साकारणार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.