'माझ्या आशीर्वादामुळेच प्रियांका बनली टॉप हिरोईन'

प्रियांका चोपडा ही आपल्या आशीर्वादामुळे मोठी स्टार बनल्याचं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव म्हणतायत. 

Updated: Dec 30, 2015, 04:28 PM IST
'माझ्या आशीर्वादामुळेच प्रियांका बनली टॉप हिरोईन' title=

इटावा : प्रियांका चोपडा ही आपल्या आशीर्वादामुळे मोठी स्टार बनल्याचं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव म्हणतायत. 

मुलायम सिंह नुकतेच सैफई महोत्सवात सामील झाले होते. यावेळी, ते प्रियांका चोपडाबद्दल बोलत होते. प्रिया्ंका इथं तीन वेळा आली.  वारंवार बोलावणं चांगलं वाटत नाही. आता ती मोठी स्टार झालीय ना, असं त्यांनी म्हटलं.

त्यानंतर बोलण्याच्या ओघातच, प्रियांकाचे वडील सेनेत होते आणि मी संरक्षणमंत्री होतो. एके दिवशी माझ्या तोंडून सहज निघून गेलं की तू भारताची मोठी स्टार होशील.... आणि घ्या बनली! माझ्या आशीर्वादामुळेच टॉपची हिरोईन बनलीय, असंही त्यांनी म्हटलं. 

बॉलिवूड कलाकरांबद्दल मुलायम सिंह यांचं प्रेम काही लपून नाही... याहीवेळेस ते अशा पद्धतीनं लोकांसमोर आलंच.