अशी झाली प्रीती झिंटा आणि तिच्या पतीची भेट, पाहा कोण आहे जीन गुडइनफ

चोरी चुपके विवाहबंधनात अडकलेली प्रिटी गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा  पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. तुम्हाला धक्का बसला, मात्र ती जीन गुडइनफ यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करण्याची शक्यता आहे. तीही राजपूत रितीरीवाजानुसार.

Updated: Mar 2, 2016, 10:01 AM IST
अशी झाली प्रीती झिंटा आणि तिच्या पतीची भेट, पाहा कोण आहे जीन गुडइनफ title=

मुंबई : चोरी चुपके विवाहबंधनात अडकलेली प्रिटी गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा  पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. तुम्हाला धक्का बसला, मात्र ती जीन गुडइनफ यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करण्याची शक्यता आहे. तीही राजपूत रितीरीवाजानुसार.

या दुसऱ्या विवाह सोहळ्याला फिल्म जगतातील दिग्गज मान्यवर मंडळी उपस्थित सहभागी होतील, अशी माहिती आहे. जीन आणि प्रीती यांची ओळख अमेरिकेत झाली. 

कशी झाली मैत्री प्रीती-जीनची

त्याआधी प्रीतीने आपला माजी बॉयफ्रेंड नेस वाडियाला सोड चिठ्ठी दिली. त्यानंतर जीनने प्रीतीला सावरलं. याचवेळी ते दोघे एकमेकांच्या सातत्याने संपर्कात राहिलेत. ते एकमेकांच्या एगदी जवळ आलेत. आधी मैत्री, दोस्ती नंतर प्रेम असे दोघांचे नाते फुलत गेले. जीनने प्रीतीला नेस विरोधात केस लढताना मदत केली.

कोण आहे जीन गुडइनफ

मार्शन बिझनेस स्कूलमधून मॅनेजमेंटची पदवी जीनने घेतलेय. लॉस एंजिलिसमधील प्रसिद्ध फायनान्सशियल कन्सलटेंट आहे. तसेच तो एनलाईन हायड्रो-इलेक्ट्रिक पॉवर कंपनीत वरिष्ठ उपाध्यक्ष आहे. नेस वाडीया विरोधातील खटल्याबाबत तो मुख्य साक्षीदार आहे.