गीता बसरानंतर आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार

मॉडेल, अभिनेत्री गीता बसलानंतर आता बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रिती झिंटा आता सातफेरे घेणार आहे. अमेरिकेतील ४० वर्षीय उद्योगपती जीन गुडएनफ याच्याशी ती विवाहबद्ध होत आहे. जानेवारीमध्ये ती विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

Updated: Nov 23, 2015, 02:38 PM IST
गीता बसरानंतर आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार title=

मुंबई : मॉडेल, अभिनेत्री गीता बसलानंतर आता बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रिती झिंटा आता सातफेरे घेणार आहे. अमेरिकेतील ४० वर्षीय उद्योगपती जीन गुडएनफ याच्याशी ती विवाहबद्ध होत आहे. जानेवारीमध्ये ती विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.

प्रिती झिंटा ही आयपीएलमधील किंग पंजाबची मालकिन असून तिचा भागिदार नेस वाडिया आहे. नेस वाडियासोबत तिचे सूत जुळल्याची चर्चा होती. मात्र, नेस वाडियाने तिचा छळ केल्याने दोघांमधील नातेसंबंध संपुष्टात आलेत.

पुढील वर्षी म्हणजेच जानेवारीत आपला प्रेमी जीन याच्याशी प्रिती विवाह करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ती जानेवारीत अमेरिकेत रवाना होणार आहे. याआधी माधुरी दीक्षितने अमेरिकेतील श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले होते. आता प्रितीही अमेरिकन उद्योगपतीशी सातफेरे घेणार असल्याचे वृत्त आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.