प्रभुदेवाचा संसार या अभिनेत्रीमुळे मोडला

बॉलिवूडमध्ये जो त्याच्या डान्समुळे जाणला जातो तो प्रभूदेवा अनेकदा चर्चेत आला जेव्हा त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. याच अभिनेत्रीमुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असं बोललं जातंय. रजनीकांतच्या चंद्रमुखी या सिनेमात भूमिका करणारी नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता. नयनताराचा जन्म बंगळुरुमध्ये झाला होता.

Updated: Mar 6, 2017, 02:14 PM IST
प्रभुदेवाचा संसार या अभिनेत्रीमुळे मोडला title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये जो त्याच्या डान्समुळे जाणला जातो तो प्रभूदेवा अनेकदा चर्चेत आला जेव्हा त्याचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं. याच अभिनेत्रीमुळे प्रभूदेवाचा संसार मोडला असं बोललं जातंय. रजनीकांतच्या चंद्रमुखी या सिनेमात भूमिका करणारी नयनताराने प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी हिंदू धर्म स्विकारला होता. नयनताराचा जन्म बंगळुरुमध्ये झाला होता.

नयनतारा ही दक्षिणात्या सिनेमातील चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. तिच्यासोबत अनेक वादविवाद देखील जोडलेले आहेत.

२००८ मध्ये सुरु झाली डेटिंग

नयनताराने २००८ मध्ये अॅक्टर-डायरेक्टर प्रभुदेवाला डेट करणे सुरु केलं. २०१० मध्ये प्रभुदेवाची पत्नीने कोर्टात याचिका टाकली की प्रभुदेवा आणि नयनतारा लिव्ह-इनमध्ये राहत आहेत. त्यानंतर पत्नी लताने धमकी दिली की जर नयनतारासोबत लग्न केलं तर ती उपोशनाला बसेल. त्यानंतर अनेक महिला संघटनांनी नयनतारावर तमिळ संस्कृती बदनाम करण्याचा आरोप लावला. २०११ मध्ये पत्नीसोबत प्रभुदेवाची फारकत झाली. १६ वर्षानंतर ते वेगळे झाले. पण २०१२ मध्ये नयनताराने म्हटलं की, आता तिने प्रभुदेवासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकले आहेत.

प्रभुदेवाची फारकत झाल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होत चालली होती. पत्नीला १० लाख रुपये आणि संपत्तीही द्यावी लागली होती. ज्याची किंमत 20-25 कोटी होती. सोबतच २ कार आणि इतर काही गोष्टीही द्याव्या लागल्या. प्रभुदेवा आणि लताचा विवाह 1995 मध्ये झाला होता. प्रभुदेवाला २ मुलं आहेत.

Image result for prabhudeva and nayantara zee