नवी दिल्ली : २०१४ या वर्षांतली सर्वात जास्त फायदा कमावणारा सिनेमा कोणता...? जर तुमचं उत्तर 'पीके' असं असेल तर तुम्ही चुकताय...
होय, कारण २०१४ या वर्षांत या वर्षांतील सर्वात जास्त फायदा कमावणारा सिनेमा आहे कंगना रानौत अभिनित 'क्वीन'...
अभिनेता आमिर खानच्या सिनेमानं आत्तापर्यंत कमाईचा उच्चांक गाठला असेल तरी गेल्या वर्षात सर्वात जास्त नफा कमावणारा सिनेमा 'क्वीन' ठरलाय.... आमिरचा 'पीके' मात्र हा रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरलाय.
जवळपास १३ करोड रुपयांची गुंतवणूक करून दिग्दर्शक विकास बहल यांनी 'क्वीन' बनवला होता. भारतात या सिनेमानं तब्बल ६१ करोड रुपये कमाई केली. म्हणजेच, गुंतवणुकीपेक्षा ३६९ टक्के जास्त कमाई...
तर, राजकुमार हिरानंदानी यांच्या बॉलिवूडचे आत्तापर्यंत सगळेच रेकॉर्ड तोडणाऱ्या 'पीके'साठी जवळपास ८५ करोड रुपयांचा खर्च आला होता. या सिनेमानं ३२६ करोड रुपयांचा गल्ला गोळा केलाय... म्हणजेच, गुंतवणुकीपेक्षा २८४ टक्के जास्त कमाई...
म्हणजेच, 'पीके' याबाबतीत तरी 'क्वीन'च्या मागेच पडलेला दिसतोय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.