व्हिडिओ : दिलीप कुमार यांना पद्मविभूषण प्रदान

भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पद्म विभूषण पुरस्‍कारासाठी २५ जानेवारीला दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्‍या नावांची घोषणा झाली होती. 

Updated: Dec 13, 2015, 06:00 PM IST
व्हिडिओ : दिलीप कुमार यांना पद्मविभूषण प्रदान title=

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना रविवारी पद्म विभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पद्म विभूषण पुरस्‍कारासाठी २५ जानेवारीला दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्‍या नावांची घोषणा झाली होती. 

दिलीप कुमार हे काही कारणास्तव राष्ट्रपती भवन येथे उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. 

दिलीप कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. याआधीही त्यांना पद्मभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्‍यात आलं होतं. 

पाहा व्हिडिओ

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.