ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही?

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय. 

Updated: Jan 10, 2017, 03:14 PM IST
ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झालाच नाही? title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या निधनाच्या बातमीनं अख्खं बॉलिवूड हळहळलं... सुरुवातीला हृदयविकाराच्या धक्क्यानं ओम पुरी यांचं निधन झालं असं सांगितलं गेलं असलं तरी आता मात्र पोस्टमॉर्टेम रिपोर्टनंतर त्यांच्या मृत्यूभोवतालचं गूढ आणखी वाढलंय. 

ओम पुरी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला नव्हता? त्यांची हत्या करण्यात आली का? जर ही हत्या होती तर ती कुणी केली? असे अनेक प्रश्न आता ओशिवारा पोलिसांना पडलेत. ओम पुरी यांचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर हे प्रश्न उभे राहिलेत.

काय आहे पोस्टमॉर्टेम अहवालात?

ओम पुरी यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालानुसार, त्यांच्या डोक्यावर चार सेंटीमीटर लांब आणि दीड इंच खोल जखमेचे निशाण होते. कॉलर बोन आणि डाव्या हातावरही काही जखमेचे निशाण आढळलेत. 

ओम पुरी शुक्रवारी आपल्या घरात मृतावस्थेत आढळले होते. अनेकांना त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाला यावर विश्वास बसत नव्हता. पोस्टमॉर्टेम अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुरी ज्या इमारतीत राहत होते तिथला व्हिजिटर्स रजिस्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी ताब्यात घेतलेत. मृत्यूपूर्वी पुरी कुणाकुणाला भेटले होते याबद्दल पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.