नवजोतसिंग सिद्धू सोडणार कपील शर्माचा शो

नवजोतसिंग सिद्धूनं त्याच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर सिद्धू भाजपलाही सोडचिठ्ठी देऊन 'आप'मध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

Updated: Jul 22, 2016, 05:00 PM IST
नवजोतसिंग सिद्धू सोडणार कपील शर्माचा शो title=

मुंबई : नवजोतसिंग सिद्धूनं त्याच्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर सिद्धू भाजपलाही सोडचिठ्ठी देऊन 'आप'मध्ये प्रवेश करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

सिद्धू याबरोबरच कपील शर्माचा शोदेखील सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून सिद्धू कपीलच्या शो चा जज आहे. कपीलच्या शोमध्ये न जाण्याबद्दल सिद्धूला सांगण्यात आल्याचंही बोललं जात आहे. 

सिद्धूनं त्याची प्रतिमा बदलण्यासाठी कपीलचा शो सोडावा असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. सिद्धूनंही हा सल्ला गांभिर्यानं घेतला आहे आणि कपीलचा शो सोडण्याच्या तयारीमध्ये तो आहे, अशी चर्चा आहे.