दहावीत नागराज किती वेळा नापास झाला ?

सैराट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरची मराठी चित्रपटांची सगळी रेकॉर्ड तोडली आहेत.

Updated: Jun 6, 2016, 08:35 PM IST
दहावीत नागराज किती वेळा नापास झाला ? title=

मुंबई: सैराट चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरची मराठी चित्रपटांची सगळी रेकॉर्ड तोडली आहेत. सैराटनं तब्बल 80 कोटींच्या वर कमाई केली आहे

या चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या नागराज मंजुळेवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे. सैराटमुळे यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या नागराजलाही अपयशाचा सामना करावा लागला होता. 

नागराज मंजुळे दहावीला दोन वेळा नापास झाला होता. नापास झाल्यामुळे फार काही बिघडलं नाही, पहिल्या प्रयत्नांमध्ये पास झालो असतो तर पुढच्या वर्गामध्ये गेलो असतो, अशी प्रतिक्रिया नागराजनं दिली आहे. 

दहावी, बारावी, एमपीएससी, युपीएससी कोणत्याही परीक्षा असोत ती अंतिम कधीच नसते, यशापयशात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठ यश नाही, असंही नागराज म्हणाला आहे.