मुंबई: सहाय्यक दिग्दर्शकाला मारहाण केल्या प्रकरणी संगीतकार इस्माईल दरबार यांना अंबोली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर थोड्याच वेळात दरबार यांना जामीन मंजूर करण्यात आला. प्रकाश चौधरीला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई केली गेली.
इस्माईल दरबार यांचा मुलगा झायेदला काल अटक करण्यात आली आहे. पगारावरुन वाद झाला आणि चौधरीला मारहाण झाली, अशी माहिती आहे. या मारहाण प्रकरणी कारवाई झाली आहे. झायेदसह त्याचे दोन साथीदारही अटकेत आहेत.
अंबोली परिसरात इस्माईल दरबार यांच्या प्रॉडक्शन हाऊसचं ऑफिस आहे. फिर्यादी प्रकाश चौधरी हा दरबार यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करायचा. पगार न मिळाल्यामुळं त्याबाबत प्रशांतनं विचारणा केली. यावेळी झायेदसह त्याच्या साथीदारांनी मारहाण करुन धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.