फिल्म रिव्ह्यू : मुंबई-पुणे-मुंबई २

 अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीचा मुंबई पुणे मुंबईनंतर आता या सिनेमाचा सिक्वल मुंबई पुणे मुंबई २ बिग स्क्रिनवर झळकलाय.. सतिश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमा ट्र् स्टोरी पाहण्याआधी या सिनेमावर एक नजर टाकू य़ा..

Updated: Nov 13, 2015, 09:47 PM IST
फिल्म रिव्ह्यू : मुंबई-पुणे-मुंबई २  title=

जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई :  अभिनेता स्वप्निल जोशी आणि मुक्ता बर्वे या जोडीचा मुंबई पुणे मुंबईनंतर आता या सिनेमाचा सिक्वल मुंबई पुणे मुंबई २ बिग स्क्रिनवर झळकलाय.. सतिश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमा ट्र् स्टोरी पाहण्याआधी या सिनेमावर एक नजर टाकू य़ा..

काय आहे कथा 
गौतम आणि गौरीची ही गोष्ट,, दोघे एकमेकांच्या प्रेमात आहेत, दोघांचं आता लग्न ठरलंय, या दोघांसोबत आता या दोघांचे परिवारही एकत्र आलेत.. पण तरीही गौरीच्या मनात काही शंका आहेत, ती अजुनही आपल्या निर्णयावर ठाम नाही.. गौतम आणि गौराचं लग्न खरंच पार पडतं का?.. की काही भलताच ड्रामा घडतो... मुंबई पुणे मुंबई २, लग्नाला यायचंच, या सिनेमाचा हा एक बॅकग्राउंड आहे.. 

कसा झाला अभिनय 
पहिल्या सिनेमाच्य़ा तुलनेत सिनेमात भरपूर मोठी टीम आहे, प्रशांत दामले, विजय केंकरे, श्रुती मराठे, असावरी जोशी अशी कलाकारांची भली मोठी टीम या सिनेमात पहायला मिळते.. दिग्दर्शक सतिश राजवाडेनं सिनेमाला बरी ट्रीटमेन्ट दिली आहे.. सिनेमाची लेंथही कमी करता आली असती,, सिनेमातली गाणी छान आहेत.. 

नेमकं काय चुकलं
हल्ली सिनेमातच जाहिरातीकरणं हा एक ट्रेन्ड होत चाललाय.. पण अशा गोष्टी प्रमाणाच्या बाहेर झाल्यावर प्रेक्षकांची लिंक तुटू शकते किंवा अशा गोष्टी प्रेक्षकांना बोर करू शकतात.. या सिनेमात जाहिरातींचा पाऊस अनुभवायला मिळतो.. स्वप्निल आणि मुक्ता ही जोडी या सिनेमाची strength आहे..

मुंबई पुणे मुंबई २ या सिनेमाला ३ स्टार्स..

पाहा व्हिडिओ रिव्ह्यू

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.