मॉडेलला फोटोशूटमुळे गमवावा लागला जीव

मॉडेलसाठी फोटोशूट हे काय नवं नसतं. फोटोशूट म्हणजे त्यांच्या करिअरमधला महत्त्वाचा भाग. पण याच फोटोशूटमुळे एका मॉडेलला आपला जीव गमवावा लागला.

Updated: Feb 8, 2016, 05:52 PM IST
मॉडेलला फोटोशूटमुळे गमवावा लागला जीव title=

लॉस एन्जेंलेस : मॉडेलसाठी फोटोशूट हे काय नवं नसतं. फोटोशूट म्हणजे त्यांच्या करिअरमधला महत्त्वाचा भाग. पण याच फोटोशूटमुळे एका मॉडेलला आपला जीव गमवावा लागला.

प्लेबॉय या मासिकासाठी फोटोशूट करतांना क्वीन ऑफ स्नॅपचीट म्हणून ओळखली जाणारी मॉडेल केटी मे हिचा मृत्यू झालाय.

हॉट अदांसाठी जगभर प्रसिध्द असणारी केटी फोटोशूट करताना एका अपघातात जखमी झाली. या अपघातात तिच्या मानेला दुखापत झाली होती. ही दुखापत किरकोळ असल्याने तिला रुग्णालयातून लगेच घरी सोडण्यात आले होते. 

केटीचं वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी अपघाती निधन झाल्याने तिच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे.