दिल्ली : दिल्लीमध्ये ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झालीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण पार पडलं.
महत्त्वाचं म्हणजे, या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांनी आपला डंका वाजवलाय. त्यामुळे, दिल्ली दरबारीही मराठीचा गजर घुमताना दिसतोय. कोर्ट, किल्ला, ख्वाडा, एलिझाबेथ एकादशी या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कारांत आपला ठसा उमटवलाय. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारलीये. पाहूयात दिल्ली दरबारी कोणकोणत्या फिल्म्सनी राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलीय.
यावेळी, बॉलीवुडचे हँडसम कपूर अर्थात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना चित्रपटसृष्टीत मानाचा समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. पण, शशी कपूर हे मात्र प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणामुळे हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्वत: उपस्थित राहू शकले नाहीत.
हिंदी चित्रपटांमध्ये 'क्वीन'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी अभिनेत्री कंगना रानौत हजर झाली होती. तर हैदर चित्रपटालाला चार श्रेणींमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेत. नानू अवनल्ला अवलू या कन्नड चित्रपटातील अभिनयासाठी विजय यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. मेरी कॉमला लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.