मुंबई : विकेन्डला बोनी कपूर यांचा लक्षमण उतेकर दिग्दर्शित लागबागची राणी हा सिनेमा झळकलाय. लालबागची राणी हा सिनेमा कसा आहे, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का? काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी यासाठी सिनेमावर एक नजर टाकूया.
मुंबईच्या त्या गर्दीच संध्या हरवते.. मग काय घडतं? यावरच संपूर्ण सिनेमा आहे. संध्या एक स्पेशल चाईल्ड असल्यामुळे तिचे आई बाबा अधिक चिंतेत असतात, तिथे संध्या आपली वाट शोधत अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटते. या सगळ्यांना संध्या आपल्या सकारात्मक आणि निरागस स्वाभावातून काही न काही देउन जातेय.. अशा काहीशा पार्श्वभूमीवरचा लालबागची राणी हा सिनेमा आहे.
दिगेदर्शक लक्षमण उतेकरचा हा दुसरा सिनेमा. या आधी त्यानं टपाल हा सिनेमा केला होता. टपाल आणि या सिनेमात तसा भरपूर फरक आहे. लालबागची राणी या सिनमेाची कथा अप्रतिम आहे. दिग्दर्शकांनं त्याची मांडणीही छान केलीये. मात्र सिनेमाचा स्क्रिनप्ले जरा फसलाय.
अभिनेत्री विणा जामकरनं या सिनेमात एका स्पेशसल चाईल्डची भूमिका पार पाडली आहे.. विणासाठी ही व्यक्तिरेखा साकारणं नक्कीच अव्हानात्मक असेल, पण तिनं ती भूमिका छान पार पाडलीये. अभिनेता अशोक हांडे, पार्थ भालेराव, प्रथमेश परब, नेहा जोशी, नंदिता धूरी यांनीही आपआपल्या व्यक्तिरेखा चोख पार पाडल्या आहेत.
सिनेमातील सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला मिळतायत २.५ स्टार्स.