'कोलावरी डी' गाणे पाहणाऱ्यांची संख्या १० कोटींच्या पुढे

२०११मध्ये आलेले तामिळ अभिनेता धनुषचे 'कोलावरी डी' हे गाणे आले आणि अल्पावधीत या गाण्याने मोठी लोकप्रियता मिळवली. या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की हे गाणे यूट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या तब्बल १० कोटीच्या पुढे गेली आहे.

Updated: Dec 5, 2015, 12:04 PM IST
'कोलावरी डी' गाणे पाहणाऱ्यांची संख्या १० कोटींच्या पुढे title=

मुंबई : २०११मध्ये आलेले तामिळ अभिनेता धनुषचे 'कोलावरी डी' हे गाणे आले आणि अल्पावधीत या गाण्याने मोठी लोकप्रियता मिळवली. या गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की हे गाणे यूट्यूबवर पाहणाऱ्यांची संख्या तब्बल १० कोटीच्या पुढे गेली आहे.

१६ नोव्हेंबरला २०११ मध्ये हे गाणे प्रसिद्ध झाले होते. आतापर्यंत १० कोटींहूही अधिक लोकांनी हे गाणं पाहिलयं. धनुषनेच हे गाणे लिहिले आणि गायले होते. १८ वर्षीय संगीतकार अनिरुद्ध रविचंद्रनयाने कोलावरी डी गाणे संगीतबद्ध केले होते. तर धनुषने एका नव्या शैलीमध्ये हे गाणे गायले.

धनुषच्या '३' या चित्रपटांत ही हे गाणे आहे. श्रुती हसनने या अभिनेत्रीने गाण्यात अभिनय केला आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन धनुषची पत्नी ऐश्वर्याने केले आहे.

'कोलावरी डी' गाणे

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.