बिग बॉसच्या घरात किम कर्दाशियां

 बिग बॉसच्या घरात एक नवी पाहुणी येणार आहे, या पाहुणीबद्दल सर्वांनाच नेहमीच आकर्षण असतं, म्हणून या पाहुणीचा प्रवेश झाला असावा, असं म्हटलं जातंय.  

Updated: Nov 17, 2014, 08:55 PM IST
बिग बॉसच्या घरात किम कर्दाशियां title=

मुंबई:  बिग बॉसच्या घरात एक नवी पाहुणी येणार आहे, या पाहुणीबद्दल सर्वांनाच नेहमीच आकर्षण असतं, म्हणून या पाहुणीचा प्रवेश झाला असावा, असं म्हटलं जातंय.  

अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही अॅक्टर किम कर्दाशियां असं या बिग बॉसच्या पाहुणीचं नाव आहे. विशेष म्हणजे ती बिग बॉसच्या घरात साडी घालून येणार आहे.
 
किम 22 नोव्हेंबर रोजी ते बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. विशेष म्हणजे किम साडी घालून ते बिग बॉसच्या घरात येणार असल्याचं कलर्स चॅनेल्समधील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

किम भारतात एक परफ्यूम लाँच करण्यासाठी येत आहे. याशिवाय किम सलमानची बहिण अर्पिताच्या लग्नाच्या रिसिप्शनसाठी येणार असल्याचंही सांगितलं जातंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.