मुंबई : कंगना रणौतच्या एक्टींगचं सगळेच कौतुक करतात. दोन नॅशनल अवॉर्ड आणि अनेक हिट सिनेमे यामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन ठरलीय. मात्र, कंगनाने तिला अॅक्टींग आवडत नसल्याचं वक्त्व्य करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
बॉलिवूडच्या क्वीनने आपल्या अॅक्टींगने सगळ्यांनाच इम्प्रेस केलंय. मात्र, कंगनाने तिला अॅक्टींग आवडत नसल्याचं एका कार्यक्रमा दरम्यान म्हटलंय.
'खर सांगायचं तर मला अॅक्टींग अजिबात आवडत नाही. मला काल्पनिक जगात जगायला आवडत नाही. अभिनय करताना आपल्या पात्रात जीव ओतावा लागतो. कधी कधी अनेक संवेदनशील भूमिकाही तुम्हाला कराव्या लागतात. या सगळ्या रुटीनमध्ये तुमच्यावर मानसिक ताण पडण्याची शक्यता असते' असं म्हणत कंगनानं अॅक्टिंग सोडून आता चित्रपट दिग्दर्शनात उतरण्याची इच्छा व्यक्त केलीय.
'कट्टी-बट्टी'मध्ये मी एका कॅन्सर पेशंटच्या भूमिकेत होते. मला माझ्या मृत्युचा सीन शूट करायचा होता. शूटच्या वेळी मी अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींवर रडायला लागायची. त्या दरम्यान मी स्वत:ची खूप काळजी घेतली कारण मला डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती होती' असंही यावेळी तिनं म्हटलं.
कंगनाचं हे स्टेटमेन्ट खुपचं धक्कादायक आहे. 'नॅशनल अॅवॉर्ड विनर' कंगनाची ही बाजू पहिल्यांदाच फॅन्ससमोर आलीय. बॉलिवूडमध्ये हे स्थान कंगनाने खूप स्ट्रगल केल्यानंतर मिळवलंय. करिअरच्या सुरुवातीला कंगनाची अनेक जण चेष्टा करायचे... तिचं इंग्लिश जेमतेम असल्यामुळेही बऱ्याचदा ती मस्करीचा विषय बनली होती.
'चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या दिवसांमध्ये कपडे घालण्याची पद्धत आणि व्यवस्थित इंग्रजी बोलता येत नसल्यामुळे मला खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. मी ज्या ठिकाणाहून आलेय त्याची मला अजिबात लाज वाटत नाही. उलट जेव्हा लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा मी माझ्या शैलीत त्यांना उत्तर देते. मी नेहमीच स्वतःवर विश्वास ठेवत आले आहे. स्त्रियांना समान हक्क मिळावा याकरिता त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे' असंही तिनं म्हटलंय.
बॉलिवूडच्या क्वीनचं हे दु:ख तिने पहिल्यांदाच शेअर केलं आहे. सध्या कंगना डायरेक्टर हंसल मेहतांच्या 'सिमरन' या सिनेमात अजून एका चॅलेजिंग भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात कंगना 30 वर्षांच्या घटस्फोटीत महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे.