जंगल बुकची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या जंगल बुकने पहिल्या दोन दिवसांतच कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. हॉलीवूड फिल्म जंगल बुक बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.

Updated: Apr 10, 2016, 01:19 PM IST
जंगल बुकची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई title=

मुंबई : ८ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या जंगल बुकने पहिल्या दोन दिवसांतच कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडलेत. हॉलीवूड फिल्म जंगल बुक बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.

पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १०.०९ कोटींची कमाई करत दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर शनिवारी या चित्रपटाने तब्बल १३.५१ कोटी रुपये कमावले. यासोबतच दोन दिवसांत या चित्रपटाने २३.६० कोटी कमावलेत. 

जंगल बुक हा चित्रपट फास्ट अँड फ्युरियस ७ आणि अव्हेंजर्सनंतर सर्वात मोठी ओपनिंग करणारा तिसरा मोठा चित्रपट ठरलाय. ओपनिंग वीकेंडमध्ये हा चित्रपट ३८ ते ४० कोटींपर्यंत कमाई करेल अशी आशा आहे.