जॉनी लिव्हरने सैराट टीमला दिल्या शुभेच्छा

भारतासह सातासमुद्रापार लोकांना याडं लावणाऱ्या सैराटचे कौतुक जॉनी लिव्हरनेही केलंय.

Updated: May 28, 2016, 10:58 AM IST
जॉनी लिव्हरने सैराट टीमला दिल्या शुभेच्छा title=

मुंबई : भारतासह सातासमुद्रापार लोकांना याडं लावणाऱ्या सैराटचे कौतुक जॉनी लिव्हरनेही केलंय.

जॉनी लिव्हरने नुकताच सैराट पाहिला. त्यानंतर ट्विटवर त्याने याबाबतची प्रतिक्रिया दिलीये. सैराटच्या टीमचे अभिनंदन. सैराटमुळे मराठी चित्रपटसृष्टीचा कायापालट झालाय. सुंदर दिग्दर्शन. संपूर्ण देशाने हा सिनेमा पाहायला हवा असं त्याने म्हटलंय.

याआधी बॉलीवूडच्या आमिर खान, तुषार कपूर, रिचा चढ्ढा, सुभाष घई, अनुराग कश्यप यांनीही सिनेमा आवडल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरुन दिली होती.