जॅकलिनचे आता हॉलिवूडमध्ये पदार्पण

Updated: Nov 12, 2014, 12:11 PM IST
जॅकलिनचे आता हॉलिवूडमध्ये पदार्पण  title=

 

मुंबई : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने सलमान खानसोबत ‘किक‘ केल्यानंतर तिची यशस्वी वाटचाल सुरू झाली. जॅकलिन आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे.

जेम्स सिम्प्सनची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डेफिनिशन ऑफ फीअर‘ या चित्रपटात जॅकलिनला भूमिका मिळाली आहे.

हा चित्रपट सायकॉलॉजिकल थ्रिलर असल्याचे सांगितले जाते.

जॅकलिनच्या या पहिल्या हॉलिवुडपटातील तिचा लूक तिने ट्विटर लूक Catherine Barrell काही दिवसांपूर्वी शेअर केला.

बॉलिवूडमध्ये आपला उत्साह दाखविल्यानंतर आता हॉलिवूडमधील रसिकांनाही किती प्रभावित करते याची उत्सुकता आहे.

या चित्रपटात अभिनेत्री कॅथरीन बॅरेल, मर्सिडिज पापालिया आणि ब्लिथ हब्बड यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटात जॅकलिनला कोणती भूमिका मिळाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

तोपर्यंत तिच्या चाहत्यांना वाट पहावी लागणार.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.