'डीडीएलजे' १००९ धावांवर बाद

मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात तब्बल 1009 आठवडे आणि सलग २० वर्षे सुरू असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'चा अखेरचा शो झाला. आता यापुढे मराठा मंदिरात तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणे वाजणार नाही. 

Updated: Feb 19, 2015, 08:52 PM IST
'डीडीएलजे' १००९ धावांवर बाद  title=

मुंबई : मुंबईच्या मराठा मंदिर चित्रपटगृहात तब्बल 1009 आठवडे आणि सलग २० वर्षे सुरू असलेला 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'चा अखेरचा शो झाला. आता यापुढे मराठा मंदिरात तुझे देखा तो ये जाना सनम हे गाणे वाजणार नाही. 
 
कोणत्याही हिंदी चित्रपटाने न केलेला विक्रम डीडीएलजेने करू एक मैलाचा दगड बनला आहे. काजोल-शाहरूख यांची प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने नुकतेच १००० आठवडे पूर्ण केले. त्यानिमित्त एक शानदार सोहळा करण्यात आला आहे.  

तब्बल १००९ आठवड्यानंतर अखेर या अजरामर सिनेमाचा प्रवास थांबला. आज मराठा मंदिरात सकाळी 9:15 वाजता सिनेमाचा शेवटचा शो पार पडला. 20 वर्ष सलग शो सुरु ठेवल्याने यशराज फिल्मसने थिएटर व्यवस्थापन आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. दीर्घकाळ सुरु असलेल्या या सिनेमाने आजवर अनेक विक्रम मोडित काढले. याआधी ‘शोले’ या सिनेमाचे सलग 5 वर्ष शो सुरु होते. मात्र ‘डीडएलजे’ने त्यालाही मागे टाकीत एका आगळ्या वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.   

मराठा मंदिरातील डीडीएलजेच्या प्रवासात अनेकांची प्रेम प्रकरण फुलून आली. अनेकांनी लग्न केलीत हा प्रवास थक्क करणारा होता. या चित्रपटाच्या कथेने, संगीताने आणि अभिनयाने अनेकांना वेड लावलं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.