रणबीर कपूरवर जेलस फील करतो: साकिब सलीम

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने अतिशय कमी वेळात लोकप्रियता कमवली. या कारणाने रणबीरच्या लोकप्रियतेवर जळणारे अभिनेते बॉलिवूडमध्ये काही कमी नाहीत.

Updated: May 14, 2014, 07:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने अतिशय कमी वेळात लोकप्रियता कमवली. या कारणाने रणबीरच्या लोकप्रियतेवर जळणारे अभिनेते बॉलिवूडमध्ये काही कमी नाहीत.
साकिब सलीम याने म्हटलंय की, `रणबीर कपूर बॉलिवूडचा खरा सुपरस्टार आहे. ज्यांने इतक्या कमी वेळात चांगलीच प्रसिद्धी मिळवलीय. त्याच्यात स्टार आणि कलाकार असे दोन्ही गुण आहेत. त्यामुळे मी रणबीर कपूर आणि त्याचे चित्रपट यावर जळत आहे.`
इतकंच नाही तर बर्फी चित्रपटांतील रणबीरचा अभिनय खरचं प्रशंसनीय आहे. तसेच ये जवानी है दिवानी चित्रपटातील त्याचा अभिनय इतर कोणालाही जमला नसता, असे साकीब म्हणाला.
साकिबने सांगितल की, मी रणबीरच्या व्यक्तीमत्वाशी जेलस आहे. त्याने खुप चांगले काम केले. त्यामुळे तो अगदी अल्प वेळेत उत्तुंग यशापर्यंत पोहचला. सलीम अमोल गुप्ते दिग्दर्शित `हवा हवाई` चित्रपटात स्केटिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी सलीमने `मेरे डॅडी की मारुती` चित्रपटात काम केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.