मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याचा सुझाननी घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत यांच्यात सुत जुळल्याचे स्पष्ट झालेय. याबाबत कंगणाने हृतिक रोशनला एक्स बॉयफ्रेण्ड म्हटलेय.
बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या बनतात. त्याचप्रमाणे हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांची जोडी जमली होती. मात्र, याबाबत कोणीही भाष्य केले नव्हते. त्यामुळे अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता मात्र, चर्चा होती.
नुकतीच कंगना रानावतची ‘आशिकी ३’मधून हकाल्लपटी केल्याची दिल्याची बातमी आली. विशेष म्हणजे या चित्रपटात हृतिक रोशन आहे आणि त्याच्याच सांगण्यावरून कंगनाची चित्रपटातून सुट्टी केल्याचे पुढे आलेय. त्यावर चिडलेल्या कंगनाने हृतिकसारखे एक्स बॉयफ्रेंड असेच करतात. असे म्हटलेय. त्यामुळे कंगनाचा हृतिक एक्सबॉय फ्रेंड होता हे स्पष्ट झालेय.
आता कंगनाने हृतिकचा उल्लेख एक्स बॉयफ्रेंड म्हणून केल्यानंतर हे दोघे एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते आणि आता त्यांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, हृतिकने या सर्व चर्चांना फेटाळून लावले आहे. त्यासंबंधीचे ट्विट करताना हृतिकने म्हटले की, प्रसारमाध्यमांनी माझ्या नावासह जोडलेल्या नावाशी अफेअर करण्यापेक्षा माझ्याकडे अनेक मुलींना डेट करण्याची संधी होती.