अभिनेता हृतिकच्या नावे बनावट ई-मेल

अभिनेता हृतिक रोशन याच्या नावे बनावट ई-मेल आयडी उघडण्यात आलेय. याबाबत स्वत: हृतिकने पोलिसांना माहिती दिलेय. त्यानुसार पोलीस याचा शोध घेत आहेत.

Updated: Dec 13, 2014, 07:37 PM IST
अभिनेता हृतिकच्या नावे बनावट ई-मेल title=

मुंबई : अभिनेता हृतिक रोशन याच्या नावे बनावट ई-मेल आयडी उघडण्यात आलेय. याबाबत स्वत: हृतिकने पोलिसांना माहिती दिलेय. त्यानुसार पोलीस याचा शोध घेत आहेत.

हृतिकने पोलिसांना सांगितले, आपल्या नावाने बनावट ई-मेल आयडी तयार करून अज्ञात व्यक्ती चाहत्यांची दिशाभूल करीत आहे. एवढ्यावरच तो न थांबता अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत, अशी तक्रार हृतिक रोशन यांने शुक्रवारी मुंबई पोलिसांत केली.

याबाबत हृतिकने पोलीस आयुक्तांनाच एक पत्र पाठविलेय. बनावट ई-मेल बंद करावा आणि संबंधितावर कडक कारवाई करावी, असे हृतिकने या पत्रात म्हटलेय. माझ्या नावे hroshan@email.com असा आयडी उघडण्यात आलाय. याच्या माध्यमातून माझ्या चाहत्यांची दिशाभूल करण्यात येत आहे, असे हृतिकने म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.