मुंबई : एकमेकांच्या सोबतीनं म्युझिक इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारे एकेकाळचे दोन आता मात्र एकमेकांना धक्काबुक्की आणि शिव्यांवर येऊन पोहचलेत.
रॅप स्टार यो यो हनी सिंग आणि बादशाह यांच्यातील मतभेद आता जास्तच तीव्र होताना दिसत आहेत. नुकतंच एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीत हे दोघं एकमेकांना भिडले.
काहीतरी क्षुल्लक कारणावरून यांच्यात वाद झाला... आणि दोघेही हाणामारी आणि एकमेकांना शिव्या देण्यावर येऊन पोहचले. पार्टीत उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना सावरलं म्हणून हे प्रकरण थोडक्यात मिटलं.
'जोरावर' सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान हनी सिहंनं बादशाहची तुलना नॅनो कारशी केली होती. 'रोल्स रॉयस आणि नॅनो चालवण्यात खूप फरक असतो' असं म्हणत हनीनं बादशाहला हिणवलं होतं.