कपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण

अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

Updated: Nov 24, 2016, 05:17 PM IST
कपिल शर्मा आणि इरफान खानच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलासा पण  title=

मुंबई : अभिनेता कपिल शर्मा आणि इरफान खान यांनी केलेल्या केलेल्या अनधिकृत बांधकामासंबंधी बीएमसीने अनधिकृत बांधकामाविरोधात पुढील दोन आठवडे कोणतिही कारवाई करू नये असे आदेश आज पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. 

पण, याचा अर्थ यांनी त्यांचे बांधकाम करत रहावे असा होत नाही. पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही काम त्या ठिकाणी करू नका असे कपिल शर्मा आणि इरफानला ठणकावून मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे.

अभिनेता कपील शर्मा विरोधात एमआरटीपी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीएमसीचे उपशहर अभियंता अभय जगताप यांनी ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल होता.  गोरेगाव विलेज ओशिवारा न्यू लिंक रोड येथील DLH ENCLAVE CTS च्या नव्या माळ्यावर नंबर 1A/1/B/2 मालक कपिल शर्मा आणि पाचव्या माळ्यावर इरफान खान यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आल होतं. 

या तक्रारीच्या विरोधात आणि बीएमसीने पाठवलेल्या नोटीशीच्या विरोधात कपील शर्मा याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.