माफी मागण्या ऐवजी गोविंदाच्या उलट्या बोंबा, तुम्हे तो हमेंही कुछ देना चाहिए!

न्यायालयाने गोविंदाला माफी मागण्यास सांगितले. मात्र, गोविंदाने जाहीर माफी मागितलेली नाही. 

Updated: Feb 17, 2016, 07:21 AM IST
माफी मागण्या ऐवजी गोविंदाच्या उलट्या बोंबा, तुम्हे तो हमेंही कुछ देना चाहिए! title=

मुंबई : अभिनेता गोविंदाची गोरेगाव येथील स्टुडिओत थप्पड खाणाऱ्या संतोष रॉय याचे लग्न होत नाही की कोणीही त्याला नोकरी देत नाही. त्यामुळे संतोष तणावात आहे. त्याने आपला लढा सर्वोच्च न्यायालयात नेला. न्यायालयाने गोविंदाला माफी मागण्यास सांगितले. मात्र, गोविंदाने जाहीर माफी मागितलेली नाही.

 

१६ जानेवारी २००८ रोजी गोरेगाव येथील फिल्मीस्तान स्टुडिओत शूटिंगच्यावेळी संतोष रॉय याने गोविंदाला प्रश्न केला असता गोविंदा भडकला. त्याने संतोषच्या कानाखाली जोरदार धप्पड मारली. त्यानंतर संतोषला कोणीही नोकरी दिली नाही. तसेच लग्न होण्यास अडचणी निर्माण झाल्यात. गोविंदामुळे मी पूर्ण रस्त्यावर आलोय, असे संतोषने म्हटलेय.

आपल्याला ८ वर्षांनंतर न्याय मिळालेला नाही. आतापर्यंत न्याय मिळण्यासाठी माझे १० ते १२ लाख खर्च झालेत. एका थप्पडमुळे माझे आयुष्य बरबाद झालेय. मी याप्रकरणी गोविंदाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला. सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना आदेश दिले की, गोविंदाने माफी मागावी. मात्र गोविंदाने संतोषची जाहीर माफी मागितलेली नाही.

दरम्यान, १२ फेब्रुवारी जुहूतील एका हॉटेलमध्ये गोविंदा भेटला. त्यावेळी गोविंदाने माफीही मागितली नाही. उलट संतोष रॉयला सांगितले, तू माझ्यामुळे फेमस झालास. त्यामुळे तूच मला काहीना काही दिले पाहिजेस. ( तुम मेरे कारण फेमस हो गए हो...तुम्हे तो हमेंही कुछ देना चाहिए)